esakal | Video : खासदार अमोल कोल्हेंनी काढले केंद्र सरकारचे वाभाडे; लोकसभेतील भाषण व्हायरल

बोलून बातमी शोधा

government should come forward to find solution to the farmers issue said MP Dr Amol Kolhe}

- देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. 
- महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे २५ हजार कोटी रुपये तातडीने देण्यात यावी.

Video : खासदार अमोल कोल्हेंनी काढले केंद्र सरकारचे वाभाडे; लोकसभेतील भाषण व्हायरल
sakal_logo
By
शरद पाबळे

कोरेगाव भीमा : शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी केंद्रसरकारने पुढे यावे, असे आवाहन करतानाच देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. असे आवाहन संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नमूद मुद्यांवर मत मांडताना, कोल्हे बोलत होते.

काय म्हणाले खासदार कोल्हे?
- देशाच्या आरोग्यव्यवस्थेची स्थिती पाहता अगोदर रुग्णालये आणि मग संसद भवन यावर आत्मचिंतन करावे. 
- महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे २५ हजार कोटी रुपये तातडीने देण्यात यावी.
- बेरोजगार तरुणांचा आक्रोश समजून घ्या आणि या धोरणांचा पुनर्विचार करावा 
- आम्ही सर्वांनी 'देश को बिकने नहीं दूँगा' हे ऐकले होते. पण आता, ओएलएक्सची जाहिरात जास्तच प्रभावी झाली 
- आत्मनिर्भर भारताची उभारणी मुठभर भांडवलदारांसाठी आहे का?
- तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत शहीद झालेल्या २०० भारतीयांचा अभिभाषणात उल्लेखच नाही 
- प्रजासत्ताक दिनी जी घटनेचे, हिंसेचे कसलेही समर्थन होऊ शकत नाही. पण, शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा जो कट रचण्यात आला तो अतिशय निषेधार्ह आहे.
- महाराष्ट्रातील भाजपाचे नेते उठसूठ आंदोलन करीत होते, त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला या शब्दामुळे समजलं.
- परदेशी व्यक्ती मानवतावादी दृष्टीकोनातून शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत एखादी टिपण्णी करीत असेल तर ती फॉरेन रिस्टक्टीव्ह आयडॉलॉजी होते! 
- बॅरीकेडस् लावणे, तटबंदी उभारणे, रस्त्यावर खिळे ठोकणे हे कोणत्या लोकशाहीचे लक्षण आहे?
- आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की, जेंव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो तेंव्हा समजून जा की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित