राज्यपालांची भर कार्यक्रमात प्र-कुलगुरुंना रोखलं; म्हणाले, 'मराठीत भाषण करा'

टीम ई-सकाळ
मंगळवार, 21 जानेवारी 2020

संशोधन हे केवळ विज्ञान तंत्रज्ञानातून न करता, मानवतेच्या दृष्टीने संशोधन होऊ शकत नाही का? असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्याारी यांनी केला.

पुणे : महाराष्ट्रामध्ये रहाणाऱ्यांनी मराठीतच बोलले पाहिजे अशी, भूमिका यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही मांडली आहे. आजएका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी त्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कार्यक्रमात सर्वांचीच भाषणे इंग्रजीत होत होती. त्यावळी कोश्यायरी यांनी प्र-कुलगुरू उमराणी यांना मध्येच रोखून मराठीतून बोला' असे आदेश दिले. त्यानंतर उमराणी यांनी मातृभाषेतून पुढील भाषण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिक्षण क्षेत्रात संशोधन झालेच पाहिजे, पण तुळशीदास, समर्थ रामदास, सेक्स पिअर यांनी कोणते संशोधन केले होते. न्यूटन, आईनस्टाईन यांनी कोणत्या महाविद्यालयात संशोधन केले होते मला माहिती नाही. पण संशोधन हे केवळ विज्ञान तंत्रज्ञानातून न करता, मानवतेच्या दृष्टीने संशोधन होऊ शकत नाही का? असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्याारी यांनी केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

"सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट ऍडमिनीस्ट्रेशन'तर्फे (सेडा) भगतसिंह कोश्या री यांच्या हस्ते मॉडर्न महाविद्यालयास सर्वोकृष्ट नाविन्य महाविद्यालय पुरस्कार, तर प्रा. देविदास वायतोंडे आणि प्रा.सोनाली परचुरे यांनी सर्वोत्कृष्ट नाविन्य शिक्षण पुरस्कार प्रदानकरण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, "सेडा'चे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सचिव धनंजय देशपांडे, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडाळाचे अध्यक्ष एस. के. जैन यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

""कोणतेही काम छोटे नसते, त्यातून काही तरी मोठे निर्माण होत असते. चार प्राध्यापक एकत्र येऊन "सेडा'ची स्थापना केली, पण त्याचे कार्य आता चारी दिशांमध्ये पोहोंचले आहे,'' अशा शब्दात कौतूक करत भगतसिंह कोश्याारी म्हणाले, ""सध्या सर्वच जण संशोधन करा, संशोधनाला प्रोत्साहन असे म्हणत आहेत, पण जगातील सर्वोत्तम शिक्षकांनी कोणत्या पदव्या घेतल्या होत्या, कोणते संशोधन केले होते असा मला प्रश्नत पडतो. नवीन शिक्षण पद्धतीची चर्चा होत असताना त्याचा उद्देश केवळ शिक्षण आणि नोकरी एवढाच उद्देश सिमीत आहे का? यापेक्षा वेगळा विचार आपण करणार नाही का? ठराविक चौकटीत शिक्षण न घेता, व्यापकपणे विचार झाला पाहिजे. यासाठी शिक्षकांची भूमीका महत्वाची असून, त्यातूनच देशाचे नवे नितृत्व घडणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: governor bhagat singh koshyari speech pune insist for marathi