

गोवेदिगरमध्ये विकासकामांचे उद्घाटन
भुईंज, ता. २१ : वाई तालुक्याच्या पूर्व भागातील धोम प्रकल्पग्रस्त गोवेदिगर गावात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या विकासकामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
किसन वीर कारखान्यानजीक गोवेदिगर येथे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या हस्ते गावातील रस्ता डांबरीकरण करणे, काळुबाई मंदिरापुढे प्लेवर ब्लॉक बसवणे, विजेचे १६ खांब बसवणे, तसेच बौद्ध विहार येथे रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुनर्वसनबाबतची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कांतिलाल पवार, संचालक प्रकाश धुरगुडे, बापू सोनवणे, सुधीर गायकवाड, प्रमोद वारागडे, सर्जेराव पवार, सतीश निकम, सागर भिंताडे आदी उपस्थित होते.
तानाजी पिसाळ यांनी स्वागत केले. कार्यक्रमासाठी आम्रपाली चव्हाण, साहेबराव पिसाळ, यशवंत पिसाळ, प्रकाश साळुंखे, बबन चव्हाण, प्रकाश पिसाळ, सज्जन पिसाळ, दीपक जाधव, संपत गायकवाड, जयसिंग पिसाळ, सुनील जाधव, बाळासाहेब जाधव, दत्तात्रय चव्हाण, शत्रुघ्न पिसाळ, अनिल साळुंखे, संजय पिसाळ, ज्ञानदेव पिसाळ, गणपत सणस आदी उपस्थित होते. ॲड. जितेंद्र पिसाळ यांनी आभार मानले.
-----------------------------
01542
गोवेदिगर ः येथे विकासकामांचे उद्घाटन करताना प्रमोद शिंदे, कांतिलाल पवार, आम्रपाली चव्हाण, साहेबराव पिसाळ आदी.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.