Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govt employees protest for old pension scheme pune news

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

पुणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध सरकारी कार्यालयांसमोर आंदोलनपूर्व निदर्शने करण्यात येत आहेत. या अंतर्गत सोमवारी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात २१ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जुनी पेन्शन मागणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व सरकारी कार्यालयांसमोर दररोज निदर्शने करण्यात येत आहेत. या अंतर्गत धर्मादाय सह आयुक्त कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज सायंकाळी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष मारुती शिंदे, राज्य सरकारी गट ‘ड’ चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण साळवी, पुणे विभागीय उपाध्यक्ष दिनेश कुचेकर, बसवराज कलदगी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते.