महिला चोरांची टोळी पकडा अन्‌ पाच हजार रुपये मिळवा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

पीएमपीमध्ये चोरी करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला पकडून देणाऱ्या चालक व वाहकांना रोख रक्कम पाच हजार रुपयांचे बक्षीस पीएमपीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. ‘डल्लाबाज महिलांच्या टोळीपासून सावधान’ या शीर्षकाखाली गुरुवारी (ता. ६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल पीएमपीने घेतली. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनी ही अधिकृत घोषणा पीएमपीच्या बैठकीत केली आहे.

पिंपरी - पीएमपीमध्ये चोरी करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला पकडून देणाऱ्या चालक व वाहकांना रोख रक्कम पाच हजार रुपयांचे बक्षीस पीएमपीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. ‘डल्लाबाज महिलांच्या टोळीपासून सावधान’ या शीर्षकाखाली गुरुवारी (ता. ६) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल पीएमपीने घेतली. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनी ही अधिकृत घोषणा पीएमपीच्या बैठकीत केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चालक व वाहकांना कामाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे, तसेच पीएमपीच्या उत्पन्नावर या महिला टोळीचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हे बक्षीस जाहीर केले आहे. यासाठी महिला चोरट्यांचे पीएमपीतील व वाहतूक मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज कारवाई दरम्यान तपासले जाणार आहेत. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये धुडगूस घालणाऱ्या या टोळीतील महिलांबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित पीएमपी व पोलिसांशी नागरिकांनी संपर्क साधायचा आहे. 

पीएमपीने प्रवास करताना नागरिक सुरक्षित असावेत. पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होणे आवश्‍यक असल्याने त्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grab a gang of female thieves and get five thousand rupees