Kaustubh Gawade
sakal
पुणे - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजपला शिक्षक मतदारसंघात विजय मिळाला, पण पदवीधर निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्याचे पडसाद शहरात उमटले. शिक्षक मतदारसंघाचे विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा जल्लोष केला नाही पण शहर कार्यालयात साधेपणाने सत्कार केला.