esakal | पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Voting

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूकीतील मतदान मंगळवारी (ता. १) होत आहे. त्यासाठी पदवीधर, शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक असल्याचे आहे.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूकीतील मतदान मंगळवारी (ता. १) होत आहे. त्यासाठी पदवीधर, शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक असल्याचे आहे. त्यानुसार मतदार असणाऱ्या शिक्षक आणि पदवीधरांना ही विशेष रजा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपत मोरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे शिक्षक आणि पदवीधर मतदारांची ही विशेष रजा मंजूर करण्यात येणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृतरित्या सूटी जाहीर केलेली नाही. परंतु एखाद्या शाळेत शिक्षक आणि कर्मचारी अधिककरून मतदार असतील, तर शाळा प्रमुख मतदानाच्या दिवशी शाळे सुरू किंवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र कोणतीही अधिकृत सूटी जाहीर करण्यात आलेली नाही, असे डॉ. मोरे यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top