पाल यात्रेची तयारी पूर्ण - सुरेश पाटील
पालमध्ये ग्रामपंचायतीची आढावा बैठक
उंब्रज, ता. ३१ : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा देवाच्या यात्रेसाठी प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायत सज्ज झाली असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता घाडगे होत्या. या वेळी ग्रामपंचायतीतर्फे यात्रा कालावधीसाठी केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
यात्रा भरविण्यात येणाऱ्या संपूर्ण वाळवंट परिसराची, मंदिर परिसराची व संपूर्ण गावातील स्वच्छता करण्यात आली असून संपूर्ण मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष प्रशांत दळवी यांनी दिली.
यात्रेसाठी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना जागा वाटप पूर्ण झाले असून, त्याठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांसाठी व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे तब्बल ५० नळाद्वारे नियोजन केले असून, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांचे पुनरुज्जीवन केल्याचे उपसरपंच गणेश खंडाईत यांनी सांगितले.
यात्रा नियोजनासाठी ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान अल्प असून, त्यात भरघोस वाढीची मागणी शासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच सुनील काळभोर यांनी केली.
पाल गावामध्ये येणाऱ्या सर्व बाजूच्या रस्त्यांची डागडुजी बांधकाम विभागाच्या सहकार्याने करण्यात आली असून, सर्व मार्गावरती विद्युत वितरण कंपनीच्या वतीने प्रकाश व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सदस्य शिवराज पाटील यांनी दिली
संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, मिरवणूक मार्गाची व यात्रा भरणाऱ्या ठिकाणाची पोलिस विभागाकडून पाहणी केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सदस्य प्रकाश जगताप यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रातांधिकारी, तहसीलदार, देवस्थान कमिटी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी पाल जिल्हा परिषद गटाचे भाजपचे नेते मदन काळभोर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गोरे, ग्रामपंचायत सदस्या जयश्री पाटील, कल्याणी इजेकर, पवित्रा जगदाळे, ग्रामविस्तार अधिकारी सुचित्रा मस्के, तलाठी रोहिणी शिवपुजे यांसह विश्वासराव काळभोर, प्रशांत भोसले, हरीश पाटील, सतीश शिंदे, संतोष पाटील, देवराज पाटील, भास्कर काळभोर, मोहन पाटील, मिलिंद पाटील, विजय दळवी, राजेंद्र मोहिते, पंडित इंजेकर, अरुण जगदाळे, विजय खंडाईत, ऋषिकेश गोरे, सचिन गोरे, सुमीत यादव, प्रकाश यादव, गणेश अवघडे, अभिषेक पाटील, ओंकार पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. शंकरराव शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश इंजेकर यांनी आभार मानले.
--------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

