कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामात येणार अडचण, कारण....

Gram Panchayat taxes are pending due to corona
Gram Panchayat taxes are pending due to corona

भुकूम (पुणे) : कोरोनामुळे ग्रामपंचायतीचे कर मोठ्या प्रमाणावर थकले आहेत. घर, कंपन्या, व्यावसायिक यांची कराची वसूली झाली नाही. त्यामुळे मुळशी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

कर वसूली मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर होत असते. कोरोनामुळे लॉकडाऊन मार्च  महिन्यापासून सुरू झाले. त्यामुळे मागील वर्षातील कर वसूली मोठ्या प्रमाणावर थकली आहे. सर्व व्यावसाय बंद असल्यामुळे कोणीही कराची रक्कम भरली नाही. 

तालुक्यातील हिंजवडी, माण, भूगाव, बावधन, मारूंजी ग्रामपंचायतीची कराचे उत्पन्न काही कोटी रूपये आहे. शासनाने येथील एमआयडीसीने कर जमा. करावा व 50 टक्के रक्कम ग्रामपंचायतीला द्यावी असा निर्णय घेतला होता. दरम्यान, ग्रामपंचायतींनी उच्च न्यालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळवली आहे. कोरोना परिस्थितीमुळे कर वसूली 10 टक्के झाली नाही अशी माहिती माण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास आधिकारी बी. आर. पाटील व हिंजवडीचे एस. आर. रायकर यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करा - अच्युत गोडबोले 
कर्मचारी यांनी वर्षभरात किमान 70 टक्के कर वसूली करावी अन्यथा पगारातून कपात केली जाईल हा नियम करोनामुळे शासनाने रद्द केला आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नियुक्ती झाली आहे. एका प्रशासककाडे अनेक गावे आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या दबाव व सहकार्याने कर वसूली होत असे. कोरोनाचे संकट दूर होऊन नविन ग्रामपंचायत पदाधिकारी येईपर्यंत कर वसूलीवर मोठा परिणाम होईल, असे लवळे येथील ग्रामविकास आधिकारी भाऊसाहेब पिसाळ व पौडचे आर. जी.कदम यांनी सांगितले. 

कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्हा परिषद, नियोजन मंडळ, पंचायत समिती यांच्या विकास निधीत मोठी कपात होणार आहे. तसेच वित्त आयोग व ग्राम निधीतील 50 टक्के निधी करोनावर मात करण्यासाठी सँनिटायझर व मास्कवर खर्च करण्याच्या ग्रामपंचायतींना सुचना आहेत. त्याचा परिणाम गावातील विकास कामांवर होणार हे निश्चित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com