Grampanchyat Election Result : कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनेलचे सुनील केशव खंडाळे

कुरकुंभ ग्रामपंचायतीचे जनतेतून निवड येणारे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. या सरपंचपदासाठी पंचरंगी लढत झाली.
kukum
kukum sakal

कुरकुंभ - दौंड ताक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास पॅनेलचे सुनील केशव खंडाळे विजयी झाले. तर या पॅनेलने सदस्यपदाच्या सात तर विरोधी बहुजन विकास पॅनेलला सहा जागा मिळाल्या. माजी पंचायत समिती सदस्य व मावळते सरपंच राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेलला सरपंचपदासह सात सदस्यांचेे बहुमत मिळून सत्ता कायम ठेवण्यात यश आले. तर विरोधकांना मिळालेल्या सहा जागाही सत्ताधाऱ्यांना अंर्तमुख करायला लावणाऱ्या आहेत.

कुरकुंभ ग्रामपंचायतीचे जनतेतून निवड येणारे सरपंचपद अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. या सरपंचपदासाठी पंचरंगी लढत झाली. त्यामुळे सरपंच निवडणूक काटे की टक्कर होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात एकतर्फी झाली. निवडणुकीत

एकूण ३२१६ पैकी २६३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ग्रामविकास पॅनेलचे सरपंचपदाचे उमेदवार सुनील केशव खंडाळे हे १५४७ मते मिळून विजयी झाले. तर बहुजन विकास पॅनेलचे सोमनाथ अशोक गायकवाड यांना ७३८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाबा शिवदास गायकवाड यांना २७५ मते, स्वप्निल दादासाहेब गायकवाड २६ मते, तर मोहन रामभाऊ सोनवणे यांना २५ मते मिळाली.

तर नोटा १९ मते पडली. सरपंचपदी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार सुनील खंडाळे यांनी ८०९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. ग्रामविकास पॅनेलचे संजय किसन शितोळे व अश्विनी बाळकृष्ण गिरमे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग दोनमधून ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच रशीद मुलाणी विजयी झाले.

kukum
Gram Panchayat Election Results: बारामतीत अजित पवार गटाचे वर्चस्व तर रोहित पवारांचे गंभीर आरोप म्हणाले, 'स्वतःची पाठ थोपटून...पैसे...'

तर बहुजन विकास पॅनेलच्या प्रमुख व माजी सरपंच जयश्री संदीप भागवत या प्रभाग एकमधून तर प्रभाग पाचमधून माजी उपसरपंच संजय जयसिंग जाधव व त्यांची पत्नी सुनीता जाधव विजयी झाले आहेत. तर माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सोनार यांना व माजी सदस्य उमेश सोनवणे यांच्या पत्नीला तर माजी उपसरपंच सायरा शेख यांचे पती रफीक शेख यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग एक :विद्या शरद दोडके, जयश्री संदीप भागवत.

kukum
Gram Panchayat Election Results: काटेवाडी अजित पवारांचीच, घरच्या मैदानात भाजपला दाखवले आस्मान

प्रभाग दोन:स्वप्निल निवृत्ती कांबळे,

रशीद सल्लाउद्दीन मुलाणी.प्रभाग तीन: अभिजित तुकाराम शितोळे,

बायाडाबाई विलास खोमणे, गणेश बापू कुंभार. प्रभाग चार: नंदा अरुण भागवत,अश्विनी बाळकृष्ण गिरमे ( बिनविरोध ), संजय किसन शितोळे ( बिनविरोध ).प्रभाग पाच: सुनीता संजय जाधव, वंदना सूर्यकांत भागवत, संजय जयसिंग जाधव. ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविलेल्या ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य व माजी बाजार समिती सभापती राहुल भोसले, राजेंद्र शितोळे,संजय शितोळे, रशीद मुलाणी, संतोष सोनार आदींनी केले. यांनी तर बहुजन विकास पॅनेलचे नेतृत्व समता परिषदेचे माजी अध्यक्ष संदीप भागवत, माजी सरपंच जयश्री भागवत, आयुब शेख, रफीक शेख, उमेश सोनवणे यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com