
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) व परिसरात श्री राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी कीर्तन भजन,महाप्रसाद आदी विविध उपक्रम राबवण्यात आले. डोर्लेवाडी येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये काल पासून (ता.५) अखंड २३ तासाचा श्री राम जय राम जय जय राम जप यज्ञ सुरू करण्यात आला होता. सकाळी बाळासाहेब महाराज नाळे यांचे श्री राम जन्माचे कीर्तन झाले.दुपारी १२ वाजता मंदिरामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. कीर्तनानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.