
कोंढवा : ‘श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘राधे कृष्ण गोपाल कृष्ण’च्या जयघोषात कात्रज-कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला. संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद स्थापित इस्कॉन मंदिरात नागरिकांनी भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केला. अभिषेकाच्या ठिकाणी वृंदावनातील नंदगाव येथील विविध मंदिरांचा आकर्षक देखावा करण्यात आला होता.