
हडपसर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अशा दोन्ही संतांचा पालखी सोहळा रविवारी (ता. २२) हडपसर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. शहराची शीव ओलांडून हा सोहळा ग्रामीण हद्दीत प्रवेश करणार असल्याने या ठिकाणी दर्शन घेऊन निरोपासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांना अधिकाधिक सुरक्षित वातावरणात व सुलभपणे दर्शन मिळून प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेता यावा, यादृष्टीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.