

पुणे : गर्द हिरव्यागार निसर्गात आणि आपल्या स्वत:च्या घरात काही निवांत क्षण घालविण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. हे स्वप्न साकार करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. प्रशस्त वास्तूच्या शोधात असणारा ग्राहक अन् स्वप्नातील वास्तू प्रत्यक्षात साकारणारे बांधकाम व्यावसायिक यांच्यातील दुवा असणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला.