शेतीच्या वादातून आजोबाची लाकडी दांडक्याने नातवाकडून हत्या

Crime
Crime
Updated on

शिक्रापूर : केंदूर (ता.शिरूर) येथील ताथवडेवस्तीत शेतातील वादामुळे नातवाने आजोबाची दांडक्याने मारहाण करून हत्या केली. या मारहाणीत मृत शंकरराव ताथवडे यांच्या पत्नी निर्मला शंकर ताथवडे याही गंभीर जखमी झाल्या आहेत.

मंगळवारी (ता.०६) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत शंकरराव कृष्णराव ताथवडे (वय ६९)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर, भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी (वय ३६,रा.केंदुर, ता.शिरूर) असे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, ''शेताला काट्या लावता काय, मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही आता तुला खल्लास करणार आहे'' असे म्हणून शंकरराव ताथवडे यांचा नातू (पुतणीचा मुलगा) भरत याने घरी जाऊन आजोबा शंकरराव यांच्छा डोक्यात, चेहर्‍यावर, मांडीवर, दगड आणि लाकडी चौरंग, टेबल, फॅनने मारहाण केली. या घटनेनंतर त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

सदर मारहाणीत निर्मला शंकर ताथवडे (वय ५५ रा.ताथवडेवस्ती केंदुर, ता.शिरूर) या त्यांच्या पत्नी भांडणे सोडवण्यास गेल्या असता त्यांना देखील आरोपी याने उजव्या हाताचे दंडावर व डोक्यावर मारहाण केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस घटनास्थळी पोहचले असता आरोपी भरत हा फरार झाला. पुढील तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com