Pune Rains : देवचं निघून गेला तर घटाचे काय करणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

''सुरक्षा भिंती पडल्याने माझा नातू गेल्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट आले. होत्याचे नव्हते झाले आमचे संपुर्ण आयुष्यचं गळून गेले. नातू राहिला नाही तरी घट स्थापना कसली, देवचं निघून गेला घटाचे काय? अशी भावना व्यक्त करीत गहिवरल्या हे फार मोठे संकट आहे.  

Pune Rains : सहकारनगर : बुधवारी रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे आंबिल ओढा लगत असलेल्या टांगेवाला वस्तीमधील गोर-गरीबांचा संसार वाहून गेला. चार दिवस झाले या घटनेला तरी ही आपला पुन्हा संसार उभा करण्यासाठी रविवारी सकाळपासून गोर, गरीब, महिला आपल्या घरातील साफसफाई करण्याचे काम करीत आहे. यात रुक्मिणी शिंदे यांचा नातू  रोहित भरत आमले (वय 15, टांगेवाला कॉलनी) वाहून गेला. 
 
त्या म्हणाल्या, ''सुरक्षा भिंती पडल्याने माझा नातू गेल्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट आले. होत्याचे नव्हते झाले आमचे सम्पूर्ण आयुष्यचं गळून गेले.नातू राहिला नाही तरी घट स्थापना कसली, देवचं निघून गेला घटाचे काय? अशी भावना व्यक्त करीत गहिवरल्या हे फार मोठे संकट आहे.  

नागरिकांनी ''आम्हाला आता या ठिकाणी राहायचे नाही सरकारने आम्हाला दुसरीकडे राहण्याची सोय करावी'', अशा अपेक्षा व्यक्त करीत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. याठिकाणी ये जाणाऱ्या मार्गावरील बोळीतील भिंत पडून सहा जणांचा मृत्यू झाल्याने येथे राहण्याची इच्छा नाही, असे नागरिकांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandmother Lost his Grandson at sahakarnagar in Pune rains