आजी-आजोबांच्या सहवासात रमले बालपण

आजी-आजोबांच्या 
सहवासात रमले बालपण
Published on

बारामती, ता. २० : विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी (ता. १०) ‘आजी-आजोबा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विविध खेळांमध्ये आजी-आजोबांनी सहभागी होत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आकर्षक ग्रीटिंग कार्ड्स आणि गुलाबपुष्प देऊन आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. बारामतीचे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल मोकाशी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘‘मुलांना केवळ आई-वडील वाढवत नाहीत, तर त्यांच्या भोवतालचे कुटुंब, शाळा, मित्र आणि समाज मिळून ‘बालपणाची परिसंस्था’ घडवत असतात. मूल हे बीजासारखे असते आणि आजी-आजोबा या परिसंस्थेचे मुख्य संवर्धक आहेत.’’
प्राचार्या जॉयसी जोसेफ यांनी नातवंडांच्या संगोपनात आजी-आजोबांचा अनुभव, संस्कार आणि मार्गदर्शन यांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांप्रती प्रेम व्यक्त करणारी सुंदर गाणी आणि नृत्ये सादर केली. त्यानंतर आजी-आजोबांसाठी विविध मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये सहभागी होताना आजी-आजोबांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. चिमुकल्यांच्या कलाविष्काराला आजी-आजोबांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com