‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मिळणार आता ओळखपत्र

‘ग्रंथ मित्र’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मिळणार आता ओळखपत्र

Published on

‘ग्रंथ मित्र’ पुरस्कारप्राप्त
व्यक्तींना आता ओळखपत्र

अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश

रफीक कुरेशी : सकाळ वृत्तसेवा

मेहकर, ता. ७ : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाकडून मागील ३० वर्षांपासून वेळोवेळी ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ओळखपत्र देण्यात यावे, यासाठी करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाने राज्यातील सर्व विभागातील ग्रंथालय अधिकाऱ्यांना पुरस्कारप्राप्त व्यक्तींची एकत्र माहिती ग्रंथालय संचालनालयास सादर करण्याचे आदेश ५ मार्च रोजी दिले आहेत. त्यामुळे ग्रंथ मित्र व्यक्तींना आता ओळखपत्र मिळणार आहेत.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय तर्फे राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ता व ग्रंथालयीन सेवक यांना डॉ. एस .आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथालय सेवक (ग्रंथ मित्र) पुरस्कार असे पुरस्कार देऊन शासनातर्फे सन्मानित करण्यात येते. राज्य शासनाकडून दलित मित्र, आदिवासी सेवक तत्सम पुरस्कारप्राप्त मान्यवरांना पुरस्कार वितरण वेळीच ओळखपत्र दिले जाते. त्याचा लाभ संबंधितांना होत असतो. संचालनालयांतर्गत पुरस्कारप्राप्त ग्रंथमित्र व्यक्तींना शासकीय ओळखपत्र प्रदान करण्यासाठी राज्य ग्रंथालय संघाकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती. सद्य स्थितीमध्ये ग्रंथालय संचालनालय मार्फत १९९४ ते २४ पर्यंत डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक असे एकूण २३३ व्यक्तींना शासनामार्फत ग्रंथ मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपापल्या विभागातील ग्रंथ मित्र पुरस्कारार्थींना संचालनालय अंतर्गत ओळखपत्र देणे करिता आधार कार्ड छायांकित प्रत दोन फोटो व प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com