हातातोंडाशी आलेला घास गेला; बावीतील द्राक्ष बाग भुईसपाट, २५ लाखांचे नुकसान

हातातोंडाशी आलेला घास गेला; बावीतील द्राक्ष बाग भुईसपाट, २५ लाखांचे नुकसान

Published on

UPB26B03835
बावी (ता.माढा) ः येथील शेतकरी अमोल मोरे यांची भुईसपाट झालेली द्राक्षेची बाग.

बावीतील द्राक्षबाग भुईसपाट; २५ लाखांचे नुकसान
शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास गेला;

सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. २२ ः बावी (ता. माढा) येथील अमोल संदीपान मोरे या शेतकऱ्याच्या मेहनतीवर क्षणात पाणी फेरले गेले असून, काढणीला आलेली, बाजाराच्या वाटेवर असलेली द्राक्षेची बाग अचानक कोसळली आहे. शेतकऱ्याच्या आयुष्याचा हिशेबच बिघडला अशी परिस्थिती आहे. कष्ट, भांडवल आणि आशा तीनही एकाच वेळी जमिनीवर पडल्याने साधारण २५ लाखांचे नुकसान झाले आहे.

मोरे यांची अडीच एकरातील द्राक्षबाग माल काढण्याच्या तयारीत असतानाच, वायर तुटून बाग भुईसपाट झाली. बाग छाटणीपासून आजतागायत लागवड, मजुरी, औषध फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि इतर सर्व खर्च मिळून सुमारे ६ लाख रुपये गुंतवणूक झाली होती. उत्पन्नाचा मुख्य आधार असलेली ही बाग नष्ट झाल्याने, पुढील हंगामाचे नियोजन या सर्वच बाबी धोक्यात आल्या आहेत.
द्राक्ष उत्पादन हे उच्च खर्च आणि उच्च जोखमीचे पीक मानले जाते. आधारभूत संरचना, तार-जाळी व्यवस्था आणि वेळेवर व्यवस्थापनावर संपूर्ण हंगाम अवलंबून असतो. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा अचानक घडलेली दुर्घटना शेतकऱ्याला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. माल काढणीच्या टप्प्यावर बाग उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मोरे आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com