२८ सप्टेंबर रोजी द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्र

२८ सप्टेंबर रोजी द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्र
Published on

२८ सप्टेंबर रोजी द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० ः महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या सोलापूर विभागाने २८ सप्टेंबर रोजी द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात या चर्चासत्राला सुरुवात होणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्‍घाटन होणार असून याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी, बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या चर्चासत्रात पुण्यातील माजंरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. ए. के. उपाध्याय हे द्राक्षबागेतील पाणी व अन्न व्यवस्थापन, डॉ. डी. एस. यादव हे फळ छाटणीनंतर द्राक्षबागेतील कीड व्यवस्थापन व डॉ. एस. के. होळकर हे द्राक्ष रोग विषाणु नियंत्रण हा विषय मांडणार आहेत. तसेच तज्ज्ञ द्राक्षबागायतदारही विषय मांडणार असून सांगलीचे विजय जाधव हे कमी पाण्यावर द्राक्षबागेचे संगोपन, नाशिकचे गणेश मोरे हे द्राक्षांच्या नवीन वाण, बार्शीचे सोमनाथ कापसे हे माती व पाणी तपासणीचे महत्त्व तर नाशिकचे अजित इंगळे हे जमिनीतील फॉस्फरस याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या चर्चासत्राचा जिल्ह्यातील द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या सोलापूर विभागाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, सचिव शंकर येणेगुरे व राज्याचे खजनिदार डॉ. चनगोंडा हविनाळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com