अंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्री गणपतीला द्राक्ष व फुलांची सजावट

श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त आज मंगळवार ता.१९ रोजी अष्टविनायक श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शनासाठी पहाटे पासुन भाविकांनी गर्दी केली होती.
Lenyadri Ganpati
Lenyadri GanpatiSakal
Summary

श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त आज मंगळवार ता.१९ रोजी अष्टविनायक श्री गिरीजात्मज गणपतीचे दर्शनासाठी पहाटे पासुन भाविकांनी गर्दी केली होती.

जुन्नर - श्री क्षेत्र लेण्याद्री (Lenyadri) ता. जुन्नर येथे वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त (Angarki Chaturthi) आज मंगळवार ता. १९ रोजी अष्टविनायक श्री गिरीजात्मज गणपतीचे (Shri Girijatmaj Ganpati) दर्शनासाठी पहाटे पासुन भाविकांनी गर्दी केली होती.

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात द्राक्ष तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोविड निर्बंध शिथील झाल्याने दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी जितेंद्र बिडवई व विश्वस्त कैलास लोखंडे, जयवंत डोके यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त शंकर ताम्हाणे, प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, मच्छिंद्र शेटे, नंदकुमार बिडवई, भगवान हांडे व भाविक उपस्थित होते. दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी गर्दीचे नियोजन केले होते. देवस्थान व आधार ब्लड सेंटर, संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नारायणगाव येथील व्यापारी रोहिदास घोलप यांनी सजावटीसाठी द्राक्ष दिली.गोळेगाव येथील रवींद्र माळी यांनी दिवसभर भाविकांना खिचडी वाटप केले. आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाच्या महिला व पुरुष सदस्यांनी लेण्याद्री परिसर व पायरीमार्गाची स्वच्छता करून आपली सेवा दिली.

सायंकाळी शिवेचीवाडी येथील मुक्ताई भजनी मंडळाने संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला. आयोजित करण्यात आला होता. रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती झाली. त्यानंतर पिंपळगावजोगा, ता. जुन्नर येथील सागर बाळकृष्ण हांडे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. तसेच, जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com