esakal | कोविशिल्ड लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

Great response from citizens to the Covishield vaccine
कोविशिल्ड लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
sakal_logo
By
मोहिनी मोहिते

पुणे कॅन्टोन्मेंट : ''कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे नागरिक सैरभर झाले आहेत. त्यांना आधार देत कोविशिल्ड लस देण्यासाठी नागरिकांनी आधारकार्ड घेऊन नोंदणी करावी,'' असे आवाहन नगरसेविका मनिषा लडकत यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत मागील चार दिवसांपासून 500 नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यांना भारत टॉकीज येथील बाई भिकाजी पेस्तनजी दवाखाना भारत टॉकीज व नाना पेठेतील कै. मामासाहेब बडदे दवाखाना नाना पेठ येथे लस दिली जात आहे.

हेही वाचा: कोथरुड येथील 'भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव' रद्द

45 वर्षांपुढील सर्वांसाठी कोविशिल्ड लस दिली जात आहे. लडकत म्हणाल्या की, ''कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 45 वर्षांपुढील सर्वच नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,'' असेही त्यांनी सांगितले.