नारायणगाव - पीएलसी अल्टिमा या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून नारायणगाव व परिसरातील ७९ गुंतवणूकदारांची ७ कोटी ६७ लाख ९४ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.या प्रकरणी गुंतवणूकदार नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वळणवाडी-वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), राजेंद्र सूर्यभान उपाध्ये (वय ४२, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या बाबत फिर्यादीत म्हटले आहे, पीएलसी अल्ट्रा कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळेल व वर्षाच्या शेवटी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळेल, अशी हमी नितीन पोखरकर यांनी शेळके यांच्यासह गुंतवणूकदारांना दिली होती.यावर विश्वास ठेवून शेळके यांनी नितीन पोखरकर यांच्या सूचनेनुसार एप्रिल २०२२ मध्ये दहा लाख रुपये राजेंद्र उपाध्याय यांच्या नावाने संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील एका खासगी बँकेत श्रीकृष्ण कॅटल अँड पोल्ट्री फीड नावाने असलेल्या खात्यामध्ये ऑनलाइन भरले. तसेच पाच लाख रुपये रोख नितीन पोखरकर यांच्याकडे नारायणगाव येथे दिले..पोखरकर यांच्या सूचनेनुसार एकूण १५ लाख रुपयांची गुंतवणूक शेळके यांनी केली. त्यानंतर पोखरकर यांनी ही रक्कम पीएलसी अल्टिमा नावाच्या मोबाईल ॲपद्वारे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे. याचप्रकारे पोखरकर यांच्या सूचनेनुसार शेळके यांच्यासह नारायणगाव परिसरातील सुमारे ७९ जणांनी मागील तीन वर्षांत ७ कोटी ६७ लाख ९४ हजार ३०० रुपयांची गुंतवणूक केली आहे..दिलेल्या आश्वासनानुसार परतावा न मिळाल्याने शेळके यांनी गुंतवणूक केलेली १५ लाख रुपये पोखरकर यांच्याकडे मागितले असता, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मिळणार नाहीत. तुम्ही राजेंद्र उपाध्ये यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले आहेत. त्यांच्याकडे पैसे मागा, असे म्हणून पोखरकर यांनी शिवीगाळ केली. पुन्हा पैसे मागितले तर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शेळके यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली आहे..गुंतवणुकीची व्याप्ती मोठीनारायणगाव पोलिसांनी तक्रारदारांकडे चौकशी केली असता नारायणगाव परिसरातील नागरिकांनी सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये काही शासकीय कर्मचारी व महिलासुद्धा आहेत. जास्त व्याजाच्या लोभापायी काही शेतकऱ्यांनी पतसंस्थांमधून कर्ज काढून गुंतवणूक केली आहे. पोखरकर यांनी आता हात वर केल्यामुळे गुंतवणूकदार मानसिक तणावाखाली आहेत. या पैकी ७९ गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.