सातारा नाबार्ड पुरस्कृत हिरवा चारा प्रात्यक्षिक प्रकल्प कार्यशाळा संपन्न

सातारा नाबार्ड पुरस्कृत हिरवा चारा प्रात्यक्षिक प्रकल्प कार्यशाळा संपन्न
Published on: 

हिरवा चारा प्रात्यक्षिक
प्रकल्प कार्यशाळेस प्रतिसाद

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : दुष्काळसदृश परिस्थितीत पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई दूर करणे, जनावरांचे आरोग्य सुधारणे आणि शेतकऱ्यांची उपजीविका सुरक्षित करणे यासाठी नाबार्ड व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यालयात ‘हिरवा चारा प्रात्यक्षिक प्रकल्प कार्यशाळा’झाली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रास्ताविकात, ६५ टक्के कमी पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींच्या पडीक जमिनी व सोसायट्यांच्या शेतात हा प्रकल्प राबवून वर्षभर अल्प दरात चारा पुरवण्याचा उद्देश आहे. नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक एम. तपन कुमार साहू यांनी प्रकल्पाची रूपरेषा मांडली. ‘इंटेलेकॅप’चे तांत्रिक अधिकारी पौलमी मुजुमदार व अंकित गुप्ता यांनी २ हेक्टर क्षेत्रावरील चारा नियोजन, मूरघास व अर्थशास्त्र समजावून सांगितले. हायड्रोपोनिक्सद्वारे ३ गुंठ्यांत दररोज १ टन चारा शक्य असल्याचे शून्य ॲग्रोटेकचे लक्ष्मण पै म्हणाले. गोविंद फाउंडेशनचे डॉ. शांताराम गायकवाड यांनी तांत्रिक समन्वय साधला.

नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक हरिदत्त पोद्दार यांनी हे मॉडेल गुजरात आणि उत्तर प्रदेशात यशस्वी ठरल्याचे नमूद केले. सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी शेतकऱ्यांना रूफटॉप सोलर योजनेचे आवाहन केले. उपस्थित शेतकरी, पदाधिकारी, अधिकारी यांचे स्वागत डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे व राजेंद्र भिलारे यांनी केले. नाबार्डच्या डीडीएम दीपाली काटकर यांनी संपूर्ण सहकार्याची ग्वाही देत आभार मानले.

--- फोटो B03816 ---
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत हिरवा चारा प्रात्यक्षिक प्रकल्प कार्यशाळेस मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्र सरकाळे. याप्रसंगी उपस्थित तपन कुमार साहू, हरिदत्त पोद्दार, दीपाली काटकर, राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे आदी मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com