देगाव येथील शाळा हरित उपक्रमात प्रथम
नसरापूर, ता. ३ ः देगाव (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने हरित शाळा उपक्रमामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. पर्यावरण शिक्षण केंद्र (सीईई) यांच्या वतीने आयोजित टाटा मोटर्स बीकन-ग्रीन स्कुल पुरस्कार २०२५ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अंतिम निकालात ग्रामीण शासकीय शाळा गटामध्ये देगावच्या शाळेने अव्वल स्थान मिळवले.
टाटा मोटर्स कंपनीने पर्यावरण शिक्षण केंद्र या संस्थेसोबत भागीदारी करून हरित शाळा मानक आराखड्यानुसार शाळा प्रशासन, सुविधा व संचालन, शिक्षण, समुदाय सहभाग या चार विषयासंदर्भात शाळेत राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील शहरी व ग्रामीण, शासकीय व खाजगी शाळांची हरित शाळा उपक्रमात निवड केली. या स्पर्धेत पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, हरित परिसर निर्मिती आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या जोरावर देगाव शाळेने हा मानाचा किताब पटकावला.
मुख्याध्यापक मधुकर यादव, महेंद्र सावंत, संध्या राऊत, विठ्ठल पवार, योगेश पवार, मिना चव्हाण या शिक्षकांसह विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ, पालक यांच्या एकत्रित प्रयत्नातून शाळेने हा यशाचा टप्पा गाठला. या यशाबद्दल जि.प. सदस्य पोपटराव सुके, पं.स. सदस्य विशाल कोंडे, माजी सदस्य कुलदिप कोंडे, माजी सभापती लहूनाना शेलार, माजी उपसभापती रोहन बाठे, गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे आणि राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, सुनिता गायकवाड, केंद्रप्रमुख साधना गायकवाड यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

