- प्रसाद कानडे
पुणे - पुणे-लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारने ‘कॅबिनेट नोट’ तयार केली असून, लवकरच शासननिर्णय प्रसिद्ध होईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे (एमआरव्हीसी) प्रकल्पाची जबाबदारी असणार आहे. पावसाळ्यानंतर रेल्वे मार्गिकेच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.