उद्धव ठाकरे म्हणाले, अजितदादांचे निर्णय नेहमीच...

मिलिंद संगई
Wednesday, 22 July 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर आपण नेहमीच धडाडीने निर्णय घेत असतात, आपणास दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बारामती (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर आपण नेहमीच धडाडीने निर्णय घेत असतात, आपणास दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

समाजकारण व राजकारणातील कित्येक अध्याय ज्यांच्या साक्षीने, साथीने अनुभवले त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी चोख...

Posted by Sunil Tatkare on Tuesday, July 21, 2020

आपण राष्ट्रवादीचे आधारस्तंभ व आम्हा सर्वांसाठी उर्जास्त्रोत आहात, तुमच्या कुशल नेतृत्वाखाली राज्याची प्रगती व्हावी, महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात सतत अग्रस्थानी राहो, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजकारण व राजकारणातील कित्येक अध्याय ज्यांच्या साक्षीने साथीने अनुभवले त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी चोख कर्तव्य बजावत असलेल्या कार्यकुशल प्रशासक अजित पवार यांना शुभेच्छा, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar दादा, तुम्ही Nationalist Congress Party - NCP चे आधारस्तंभ व आम्हा सर्वांसाठी...

Posted by Supriya Sule on Tuesday, July 21, 2020

कोरोनाच्या संकटातही नऊ वाजता मंत्रालयात येऊन बसणारा मंत्री, कोरोनाच्या काळात पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याला 50 लाखांच्या विमा संरक्षणाचा कवच देण्याचा प्रस्ताव मान्य करणारे अजितदादा आहेत, त्यांचा कामाचा धडाका व उत्साह आजही कायम आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भावना व्यक्त केल्या. 

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा करत त्यांना सुदृढ दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही धडाडीचे नेतृत्व आणि आमचे नेते, या शब्दात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिस्तप्रिय व कृतीशील नेते, अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या सदिच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

महाराष्ट्राच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असलेल्या व आपले प्रेरणास्थान व मार्गदर्शक असलेल्या अजितदादांना शुभेच्छा, अशा शब्दात धनजंय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे कणखर नेतृत्व असलेल्या अजितदादांना दीर्घायुष्य लाभावे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे नेते अनिल परब, दत्तात्रेय भरणे, आदिती तटकरे यांनीही त्यांना सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings from various leaders to Deputy Chief Minister Ajit Pawar