वाघोलीत मिळतेय धान्य; एका दिवसात 1100 कार्डधारकांना वाटप

वाघोलीत मिळतेय धान्य; एका दिवसात 1100 कार्डधारकांना वाटप

वाघोली : वाघोलीतील केसरी शिधापत्रिका धारकांना शुक्रवारपासून धान्य वाटपास सुरुवात करण्यात आली. व्ही. एस. सातव हायस्कूलच्या मैदानात हे वाटप सुरू आहे. एका दिवसात अकराशे कार्डधारकांना वाटप करण्यात आले. सकाळपासून धान्य वाटपास सुरुवात झाली. त्यापूर्वी दोन दिवसापासून स्वस्त धान्य वितरकांनी कार्ड धारकांना टोकन देण्यास सुरुवात केली होती. 

गुरुवारपर्यंत 2700 टोकन देण्यात आले होते. आज माल आल्यानंतर त्यातील पहिल्या 700 ते 800 टोकनधारकांना धान्य नेण्यास सांगण्यात आले. मात्र, धान्य मिळत असल्याचे कळाल्यानंतर कार्डधारकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. टोकन नसलेलेही धान्य घेण्यासाठी येत होते. त्यातील अनेकांना परत पाठविण्यात आले. काही कार्डधारकांनी वादही घातला. काही नागरिक छत्र्या घेऊन आले होते. तर अनेकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी धान्यासाठी आणलेल्या पिशव्या डोक्यावर धरल्या होत्या. धान्य देण्यासाठी चार काट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शुक्रवारी 1100 कार्डधारकांना वाटप करण्यात आल्याची माहिती वितरक राहुल गुळवे यांनी दिली. सामाजिक अंतर न ठेवता गर्दी केल्यास वाटप बंद करण्यात येईल. असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांनी वाटपाच्या ठिकाणी दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लोकप्रतिनिधींचा असाही हस्तक्षेप      

सामाजिक अंतर ठेवून वाटप होणे गरजेचे असल्याने गर्दी होऊ नये, यासाठी वितरक टप्याटप्याने टोकनधारकांना बोलवत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी टोकन धारकाचा ठरवून दिलेला दिवस आलेला नसतानाही माझ्या वार्डमधील आहे त्याला द्या, असे सांगत हस्तक्षेप करीत आहे.

सामाजिक अंतर ठेवून वितरण गरजेचे आहे. कार्डधारकांची संख्या 10 हजार असल्याने टप्याटप्याने वितरण करण्यात येईल. नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. ठरवून दिलेल्या दिवशी धान्य घेऊन जावे, असे आवाहन करीत गर्दी करून सामाजिक अंतर न ठेवल्यास वितरण बंद करण्यात येईल, असा इशारा तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाने दिला आहे.

- एकूण केसरी कार्डधारक - 10,000

- एकूण वितरक बचत गट - 3

- मिळत असलेले धान्य - गहू व तांदूळ

- गहू -- 3 किलो प्रति व्यक्ती 

- तांदूळ - 2 किलो प्रति व्यक्ती

- शुक्रवारी झालेले वाटप - 1098 कार्डधारक

- व्यक्तींची संख्या -- 5490

- शुक्रवारी एकूण धान्य वाटप -- गहू -- 16,470 किलो

- तांदूळ -- 10,980 किलो

- वाटपाची वेळ -- सकाळी आठ ते रात्री आठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com