रविवारपासून पुणेकरांना दिलासा! लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात 'ही' दुकाने राहणार सुरू!

Grocery, vegetable, fruit market will continue in the morning time from Sunday in lockdown
Grocery, vegetable, fruit market will continue in the morning time from Sunday in lockdown

पुणे : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गेल्या चार दिवसांपासून घरातच बसून राहिलेल्या नागरिकांना रविवारपासून थोडाफार दिलासा मिळणार आहे. किराणा माल, भाजी, फळे तसेच चिकन, मटन, मासे, अंडी विक्रीसाठी रविवारपासून परवानगी मिळणार आहे. त्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ ही वेळ महापालिकेने निश्चित केली आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, यासाठी रविवारी (ता.१९) दिवसभर दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरात १४ ते २३ जुलैपर्यंत पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यामध्ये प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात आयुक्त विक्रमकुमार यांनी १२ जुलै रोजी काढलेल्या आदेशात पहिले पाच दिवस म्हणजे १८ जुलैपर्यंत लॉकडाउन कडक असेल, असे म्हटले आहे. या काळात फक्त दूध आणि वृत्तपत्र वितरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच औषधाची दुकानेही उघडी ठेवण्यास सांगितले होते. 

या लॉकडाउनमधील पहिला टप्पा शनिवारी रात्री बारा वाजता संपेल. दुसरा टप्पा रविवारपासून (ता.१९) सुरू होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारपासून 23 जुलैपर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी ठोक व किरकोळ दुकाने (किराणाभुसार मालाची) तसेच आडते भाजी मार्केट, फळ बाजार, भाजी मार्केट रविवारपासून सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान उघडी राहणार आहेत. ई-कॉमर्सलाही यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट पोर्टल्सच्या माध्यमातून नागरिकांना वस्तू घरपोच मिळणार आहेत, असे महापालिकेने १२ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, इतर सर्व दुकाने, व्यवसाय, वाईन शॉप, सलून आदी सर्व बंदच राहणार आहेत. शहरातील वाहतूकही बंदच असेल. कामाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच कामाखेरीज घराबाहेर पडू नका, असे महापालिकेनेही नागरिकांना आवाहन केले आहे. लॉकडाउनच्या काळात आपत्तकालीन वैद्यकीय मदतीसाठी रिक्षा आणि कॅब सुरू असतील. तसेच पीएमपीचीही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बससेवा सुरू आहे. त्यात सुमारे १२५ बसद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक सुरू आहे, असे पीएमपीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये रविवारपासून (ता.१९) होणाऱ्या शिथिलेतमध्ये काही बदल असतील, तर शनिवारी (ता.१८) सायंकाळी महापालिका आयुक्त विक्रमकुमार कळवतील, असे महापालिकेतील प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. 

लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याबाबत पोलिस सहआयुक्त म्हणाले...

"उद्यापासून पाच दिवस शहरातील किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. या किराणा दुकानासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर दुकाने सुरू केल्यामुळे पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी उद्या रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत दुकाने सुरू राहतील. सोमवारपासून (ता.२०) सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत दुकाने खुली राहतील."

नागरीकांचा चांगला प्रतिसाद, पुढेही कायम राहावा 
दहा दिवसाच्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात बहुतांश पुणेकर घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांनी असाच सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आपण कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करु शकतो, असेही डॉ. शिसवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com