घरात बसून रोज हजारो कुटुंबांचे सामूहिक ध्यान

घरात बसून रोज हजारो कुटुंबांचे सामूहिक ध्यान
Updated on

पुणे - लॉकडाउनच्या काळात एकटेपणा दूर होण्यासाठी अनेकजण घरामध्ये विविध उपाय करत आहेत. सहजयोग ध्यान साधनेचे साधक मात्र घरामध्ये बसून (15 मार्चपासून) रोज सकाळ-संध्याकाळ निर्विचार ध्यानाचा आनंद लुटत आहेत. ध्यान संपल्यानंतर विश्‍वकल्याणासाठी प्रार्थनेबरोबरच कोरोनापासून बचावाबाबत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूूचनाही दिल्या जात आहेत. आतापर्यंत विविध ऑनलाइन माध्यामांद्वारे जगभरातील दोन लाख साधकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

श्री माताजी निर्मलादेवी प्रणित सहजयोग ध्यान ही ध्यानाची सोपी पद्धत आहे. पुण्यासह महाराष्ट्र आणि जगभरात लाखो नागरिक हे ध्यान करतात. लॉकडाउनच्या काळात त्याना एकत्र जोडण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. घरामध्येच राहून दिवसभर या साधकांसाठी विविध कार्यशाळा, शास्त्रीय संगीताचे गायन-वादनाचे कार्यक्रम, प्रशिक्षण, प्रश्‍नोत्तरे, नव्या साधकांना मार्गदर्शन अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्यात येत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जगातील 59 देशांतून सहभाग
लॉकडाउन सुरू झाल्यानंतरच्या गेल्या 25 दिवसांमध्ये नॅशनल ट्रस्टच्या माध्यमातून यूट्युब चॅनलद्वारे ध्यानाचे प्रसारण रोज पहाटे 5.30 वाजता आणि सायंकाळी सात वाजता करण्यात येत आहे. यूट्युबवरील एकूण 7.31 लाख तास हे प्रसारण पाहिले गेले आहे. तसेच प्रत्येक भेटीदरम्यान त्यांचा याठिकाणी थांबण्याचा काळ 23 मिनिटे राहिला आहे. इंडिया सहजयोगा या फेसबुक पेजवर 61 हजार जणांनी 16 हजार तास ध्यानाचा आनंद घेतला आहे. आतापर्यंत फेसबुक, यूट्युब, मिक्‍सलर, नॅशनल टीव्ही अशा ऑनलाईन माध्यमांद्वारेजगातील 59 देशांमधील 12 लाख जणांनी या प्रसारणाला भेट दिली आहे.

"आत'मध्ये राहण्याचा विनामूल्य व सहजमार्ग
सहजयोग ध्यानामुळे एकाग्रता वाढल्याने चिंता, नैराश्‍यातून बाहेर पडून मनुष्याला आत्मिक बळ प्राप्त होते. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य वाढीस लागते. ऑनलाइन मार्गदर्शन मिळविण्यासाठी टोल क्रमांक आहे 180030700800. ही सेवा दिवस-रात्र फ्री मेडिटेशन हेल्पलाईन म्हणून कार्यरत आहे. त्यातून रोज विविध वयोगटातील 1200 स्त्री-पुरुष जोडले जात आहेत.

"मातृवंदने'तून संगीताचा आनंद
रोज दुपारी साडेतीन वाजता जगभरातील विविध ठिकाणाहून भारतीय शास्त्रीय संगीत आणि भजनाचाही आनंद घेतला जात आहे. त्याअंतर्गत "मातृवंदना' या मालिकेत आतापर्यंत 25 ते 30 जणांनी सादरीकरण केले आहे. त्यामध्ये अहमद सेलीम इरेगन (सरोद, टर्की), तान्या वेल्स (गायन), अन्टोन पेव्हवरॉव (स्नॅसाफोन, ऑस्ट्रिया), लिओ व्हेर्टुन्नी (सितार, इटली), लिझा वुॅल्फ (सूरमंडल, रशिया) आदींचा सहभाग आहे.

लॉकडाउनच्या काळात सहजयोगाचे सर्व साधक सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहेत. तंत्रज्ञानामुळे सोशल मिडियाचा वापर करून त्यांना एकत्र जोडणे शक्‍य झाले आहे. सहजयोग ध्यानपद्धती अतिशय सोपी आणि सहज आहे. जीवन निरामय व आनंदी बनविणे हाच त्याचा उद्देश आहे.
- दिनेश राय, उपाध्यक्ष, नॅशनल ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com