वकील मंडळीही ऑनलाईनद्वारे करताहेत ज्ञान आत्मसात

वकील मंडळीही ऑनलाईनद्वारे करताहेत ज्ञान आत्मसात
Updated on

बारामती : लॉकडाऊनने जगभरात आमूलाग्र बदल घडले, त्याला न्याय व विधी व्यवस्थाही अपवाद ठरली नाही. बदलत्या स्थितीत नवीन उपयुक्त बदल आत्मसात करण्यासाठी वकील मंडळीही सरसावली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. माहिती तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसलेले ज्येष्ठ विधीज्ञही आता नव्याने कामकाज शिकून घ्यायला लागले आहेत.

जुने जाणते वकिल माहिती तंत्रज्ञान व ऑनलाईन लेक्चरची पद्धत समजून घेत राज्यभरातील वकील, वकिलीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी व नवोदित न्यायाधीशांना विनामोबदला मार्गदर्शन करीत आहेत.

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष अविनाश भिडे यानी फौजदारी कायद्यातील विविध तरतूदीवर स्वत: अनेक मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. नाशिक वकील संघटनेद्वारे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. जयंतराव जायभाये, ॲड. नितीन ठाकरे, ॲड. गोपीनाथ भिडे, ॲड. शरद गायधने यांच्या सहकार्याने 35 ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले गेले. एकाच वेळेस पाचशेहून अधिक वकीलांचा त्याला प्रतिसाद मिळाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती वकिल संघटनेद्वारे देखील ॲड.डॉ.सुधाकर आव्हाड .ते दिवाणी कायद्यातील नवनवीन बदल, रेरा कायद्याची माहिती, ॲड डॉ .उदय वारुंजीकर यांचे कोरोनानंतर वकील-न्यायाधीशाना येणाऱ्या संधी, ॲड. पंकज सुतार यांचा कोव्हीड 19 बाबत असलेला कायदा, त्याची तरतूद याबाबत तसेच ॲड.अविनाश भिडे यांच्या फौजदारी कायद्यातील पंचनामा व जाबजबाबाचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड चंद्रकांत सोकटे व सहकारी मित्र मदत करत असल्याचे या प्रकल्पाचे समन्वयक ॲड. गणेश आळंदीकर यांनी सांगितले. ऍड. आळंदीकर म्हणाले, व्याख्यानामुळे नवोदीत वकिलाना व न्यायाधीशाची परिक्षा देणा-यांनाही फायदा होईल. त्यामुळे नाशिक, पुणे सोलापूरची माहितीही आम्ही तयार केलेल्या ग्रुपवर देतो,  त्यामुळे फक्त आमचेच नाही तर इतरांनी आयोजित व्याख्यानाचाही सर्वाना लाभ होतो. अँड्रॉईड मोबाईलधारकांना याचा लाभ घेता येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. सी. चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  गौतम पटेल हे ऑनलाईन व्याख्यान देत आहेत. जेष्ठ वकिल ॲड. भास्करराव आव्हाड ,ॲड हर्षद निंबाळकर ,ॲड अहमद खान पठाण यांनी फौजदारी कायदा , ॲड अरविंद आव्हाड यानी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व राज्यघटनेतील तरतुदी अशा विषयावर व्याख्याने दिली आहेत.

पुणे  येथील जन अदालत संस्थेमार्फत देखील ॲड .सागर नेवसे यांनी त्यांच्या सहकारी वकिल वर्गाद्वारे आत्तापर्यंत 23 व्याख्यानांचे आयोजन केले आहे. सोलापूर येथील ऍड. बसवराज सलगर व ऍड. नितीन ठाकरे, ऍड. गोपीनाथ तिडके व ऍड. शरद गायधने यांनी 14 व्याख्यानांचे आयोजन केले. 

वकिलांना चांगली संधी...

सध्या देशभरात लॉकडाऊन चालू असताना वकिलाना न्यायालयाचे कामकाज ठप्प झाल्याने वरिष्ठ वकिलांचे  मार्गदर्शन घरबसल्या मिळत असून एक चांगली संधी वकिलांना मिळाली आहे. तिचे त्यांनी सोने करावे.

- ऍड. सुधाकर आव्हाड, ज्येष्ठ विधीज्ञ  

ऑनलाईनचे तंत्रज्ञान समजून घ्यावे लागेल...

लॉकडाऊननंतर न्यायालयाच्या कामकाज पद्धतीत मोठा बदल होईल. न्यायालयाचे बहुतांश कामकाज ऑनलाईन होणार आहे. दावे देखील ऑनलाईन दाखल करावे लागतील. त्यामुळे आता सर्वानीच ऑनलाईनचे तंत्रज्ञान समजून घेण्याची गरज आहे.

- ऍड. डॉ .उदय वारुंजीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com