ढेबेवाडी बनपुरीतील श्री नाईकबा विद्यामंदिरात सत्कार
मोठे व्हा; पण खऱ्या सोबत्यांना विसरू नका
मृणाल पाटील : बनपुरीच्या विद्यामंदिरात सत्कार, पारितोषिक वितरण
ढेबेवाडी, ता. २१ : प्रगतीचे पंख लावून तुम्ही कितीही मोठे व्हा; परंतु आपले आई- वडील, शिक्षक, शाळा आणि गावाला कधीही विसरू नका, तुमच्या जीवनाच्या वाटचालीतील हेच खरे सोबती आहेत, त्यांच्या विषयीचा आदरभाव कमी होऊन देऊ नका, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या मृणाल पाटील यांनी केले.
बनपुरी (ता. पाटण) येथील श्री नाईकबा विद्यामंदिरात मृणाल पाटील यांचा सत्कार व वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आर. के. भोसले, उद्योजक महेश पाटील, सरपंच मनोज पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे, श्री नाईकबा यात्रा समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, आबासाहेब कंक, मुख्याध्यापक एस. बी. कोळी आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
मृणाल पाटील म्हणाल्या, ‘‘ज्ञान ही न संपणारी जीवनातील खूप मोठी आणि महत्त्वाची शिदोरी आहे. ही अशी गोष्ट आहे जी दिल्याने वाढते. विद्या नम्रतेमुळेच शोभून दिसते. मी आज तुमची मैत्रीण बनून तुमच्याशी संवाद साधायला आली आहे. तुमचे प्रश्न, अडचणी मनमोकळेपणाने मला सांगा, त्यांची सोडवणूक करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.’’
श्री. भोसले, महेश पाटील, एन. टी. मदने, रमेश लोंढे, अनिल पाटील, मनोज पाटील, कोमल सदामत यांच्यासह विद्यार्थ्यांची भाषणे झाली. एस. बी. कोळी यांनी प्रास्ताविक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विविध परीक्षा व स्पर्धांतून चमकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण झाले. क्रीडा शिक्षक श्री. लोंढे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. टी. एच. शेख यांनी आभार मानले
-----------------------
08141
बनपुरी : मृणाल पाटील यांच्या सत्कारप्रसंगी आर. के. भोसले, एस. बी. कोळी, महेश पाटील, मनोज पाटील, आबासाहेब कंक, शिवाजीराव जगदाळे, अनिल पाटील, रमेश लोंढे आदी.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

