जीएसटी संकलनात २२.९ टक्क्यांनी वाढ

जीएसटी संकलनात २२.९ टक्क्यांनी वाढ
Published on: 

जीएसटी संकलनात
२२.९ टक्क्यांनी वाढ

ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटींचा महसूल

नवी दिल्ली, ता. १ : देशात ऑक्टोबरमध्ये २.३१ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल संकलित झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ही गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे.
जीएसटी संकलनाची आकडेवारी रविवारी जाहीर करण्यात आली. सलग चौथ्या महिन्यात जीएसटीचे संकलन दोन लाख कोटी रुपयांच्या पुढे नोंदविण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटी संकलनात १४.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. एप्रिलमध्ये एका महिन्यात २.४३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी देशाच्या तिजोरीत जमा झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटीचा महसूल हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक कायम राहिला असून, जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये हाच घटक महत्त्वाचा ठरत आहे. प्रत्येक महिन्यात नोंदविण्यात येणारी नियमित वाढ देशाची क्रयशक्ती आणि कर प्रणालीतील सुधारणा दाखवून देत आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये आयातीतून मिळणारा महसूल ४२.२ टक्क्यांनी वाढून ७२,२४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी हा महसूल ५०,७९६ कोटी रुपये होता. देशांतर्गत जीएसटी महसूल तुलनेने कमी म्हणजे १५.८ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनामध्ये २५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.


उत्तर प्रदेशात सर्वाधिक वाढ
जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र ३५,१५० कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राच्या करसंकलनामध्ये १३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कर्नाटकने१८ टक्के वाढींसह १५,९२२ कोटी, गुजरातची १६ टक्के वाढीसह १३,५१६ कोटी जीएसटी संकलन केले आहे. उत्तर प्रदेशने सर्वाधिक २४ टक्क्यांसह १०,२३५ कोटी रुपयांचा महसूल संकलित केला आहे. याशिवाय, आसाममध्ये ४७ टक्के वाढीसह १९३४ कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. झारखंडच्या जीएसटी संकलनात ३१ टक्के, तर मध्य प्रदेशात २९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.