
Madhuri Misal Marathi News : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक आमदारांनी मंत्रीपदाच्या शपथाही घेतल्या. पण पालकमंत्रीपदं कोणाला मिळणार याबाबत निर्णय होत नव्हता. पण शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्यातील तीन आमदारांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. यामध्ये भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांचाही समावेश आहे.