Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

गंभीर आजारामुळे दैनंदिन व्यवहार आणि कायदेशीर-आर्थिक निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेल्या वडिलांचे कायदेशीर पालकत्व त्यांच्या मुलीकडे सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on: 

पुणे - गंभीर आजारामुळे दैनंदिन व्यवहार आणि कायदेशीर-आर्थिक निर्णय घेण्यास असमर्थ ठरलेल्या वडिलांचे कायदेशीर पालकत्व त्यांच्या मुलीकडे सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने गंभीर आजारी व्यक्तीच्या मालमत्तेचे व्यवस्थापन (पेरेन्स पॅट्रिए) या तत्त्वाचा आधार घेत हा दिलासा दिला. मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने मिनोष्का डिसूझा यांच्या याचिकेवर हा आदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com