

उसाला स्पर्धात्मक दर देणार
सौरभ शिंदे; गुडगुंटी- प्रतापगडच्या गाळप हंगामाचा प्रारंभ
कुडाळ, ता. १३ : जावळी तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुडगुंटी प्रतापगड या नव्या युनिटच्या माध्यमातून संधी प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला आजूबाजूच्या अन्य कारखान्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक दर दिला जाईल, अशी ग्वाही प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिली.
सोनगाव-करंदोशी (ता. जावळी) येथील गुडगुंटी- प्रतापगड शुगर्स ॲण्ड बायो एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडच्या २०२६-२७ ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊस मोळीचे पूजन करून झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे, गुडगुंटी प्रतापगड शुगर ॲण्ड बायो एनर्जीचे अध्यक्ष विरुपाक्षय्या गुडगुंटी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र परामणे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, तसेच प्रतापगड कारखान्याचे संचालक, शेतकरी उपस्थित होते.
गुडगुंटी म्हणाले, ‘‘कारखान्याची ऊस गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मेट्रिक टन होती. त्यामध्ये ३३०० मेट्रिक टन वाढ झाली. शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा, जेणेकरून साखर उतारा चांगला मिळेल आणि उसाला चांगला दर देणे शक्य होईल. या परिसरातील कारखान्याने उसाला जो भाव देतील तो भाव दिला जाईल.’’
01018
सोनगाव : गळीत हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ऊस मोळीचे पूजन करताना मान्यवर. (महेश बारटक्के : सकाळ छायाचित्रसेवा)
...............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.