साखरगाठींचा गोडवा वाढला

गुढीपाडव्याच्या सणात गाठीचे विशेष महत्त्व असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे या व्यवसायाला फटका बसला होता.
Sakhar Gath
Sakhar GathSakal
Updated on
Summary

गुढीपाडव्याच्या सणात गाठीचे विशेष महत्त्व असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे या व्यवसायाला फटका बसला होता.

स्वारगेट - गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर बाजारात साखरगाठी (Sakhar Gath) खरेदी करण्यास ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. आकर्षक नक्षीकाम, वेगवेगळे रंग, रेखीव आकार, वाघनख, छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे असलेल्या गाठींची खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती आहे. विशेषतः भगव्या रंगाच्या गाठीला मोठी मागणी आहे. या गाठी विविध वजनांत उपलब्ध आहेत.

गुढीपाडव्याच्या सणात गाठीचे विशेष महत्त्व असते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे या व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, सध्या दिवसाला तीनशे ते चारशे किलोच्या गाठी दररोज विकल्या जात आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले. गाठी तयार करण्यासाठी शहरात दहा ते बारापेक्षा जास्त मोठे कारखाने आहेत. साखरेच्या पाकात हायड्रा पावडर वापरतात, त्यामुळे गाठीला कडकपणा येतो. नंतर तो सागवानी साच्यात भरला जातो. पंधरा ते वीस मिनिटे ठेवला जातो. साधारण पाऊण तासात गाठी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. या गाठींना साधारण गुढीपाडव्याच्या आधी सात दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मागणी असते. गाठीचा आकार, नक्षीकाम व रंगानुसार भाव ठरलेले असतात. वेगवेगळ्या रंगाच्या गाठींच्या किमती जास्त असतात, , असे गाठी व्यावसायिकांनी सांगितले. दहा रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आकारानुसार गाठी उपलब्ध आहेत.

आमच्याकडे पाच पिढ्यांचे गाठी तयार करण्याचे सागवानी साचे आहेत. आम्ही त्याला खूप जपतो, कारण ते पुन्हा मिळत नाहीत. भगव्या रंगाच्या गाठीला मोठी मागणी असते. भगव्या रंगाच्या व लहान गाठींना मोठी मागणी आहे.

- राम अग्निहोत्री, साखरगाठी व्यावसायिक

गेल्या वर्षी कोरोनामुळे व्यवसायास मोठा फटका बसला. केवळ पाच हजार किलोंचा माल विकला गेला होता. मात्र, या वर्षी बाजारात तेजी असल्याने दहा हजार किलो गाठी विकल्या जातील.

- मंगल ठेंबे, साखरगाठी व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com