
पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजाराच्या नवीन इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या इमारतीत अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळासाठी एक अतिरिक्त तळमजला वाढविण्यात आल्याने अद्याप बांधकाम सुरू असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला विलंब झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीही मंत्री रावल यांनी या वेळी दिली.