रात्री सापळा लावला अन् तो अलगद जाळ्यात सापडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पोलिसांनी दिनेश ढवळे या गुन्हेगारास  सापळा रचून  ताब्यात घेतले.

पुणे : बेकायदा गावठी पिस्तुल बाळगणार्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याकडून पिस्तूल व दोन जीवंत काडतुसे असा 40 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दिनेश ढवले (वय 22, रा. साईनगर, हिंगणे खुर्द) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे  हे त्यांच्या पथकासह  अलंकार  पोलिस ठान्याच्या हद्दीत रात्रगस्त घालत होते. त्यावेळी अभिलेखावरील गुन्हेगार दिनेश ढवळे हा सृष्टी गार्डन समोरील १०० फुटी रोडलगत थांबलेला असून त्याचेकडे पिस्तुल आहे, अशी खबर पोलिस कर्मचारी नितीन रावळ व कैलास साळुंके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दिनेश ढवळे यास  सापळा रचून  ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gunmen arrested in Pune