पुणे - मुंबईतून पुण्यातील शाखेत सोन्याचे दागिने जमा करण्यास आलेल्या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कमेरला पिस्तुल लावून व जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील ६९ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हि घटना बुधवारी (ता.११) सकाळी सव्वा नऊ वाजता पुणे स्टेशन रेल्वे स्थानकासमोर घडली.