
मार्केट यार्ड : गुरुपौर्णिमेला पुष्प तसेच पुष्पगुच्छ देऊन गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. याखेरीज शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होतात. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक फूलबाजारात डच गुलाब, शेवंती, गुलछडी, जरबेरा अशा फुलांची मागणी वाढली होती.