हराळवाडीत कुस्तीचा थरार,रामा शेळके ठरला‘गुरु रेवणसिद्ध केसरी’ चा मानकरी
KMT26B00943
हराळवाडी (ता. मोहोळ) : येथे गुरू रेवणसिद्ध यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत कुस्ती खेळताना पैलवान मंडळी.
---
रामा शेळके ‘गुरू रेवणसिद्ध केसरी’चा मानकरी
हराळवाडीत गुरू रेवणसिद्ध यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोरवली, ता. २१ : हराळवाडी (ता. मोहोळ) येथील ग्रामदैवत गुरू रेवणसिद्ध यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेत अंतिम व मानाची कुस्ती हराळवाडीचा पै. रामा शेळके आणि सांगलीचा पै. राजकुमार पाटील यांच्यात रंगली. एक लाख रुपयांच्या इनामासाठी झालेल्या या लढतीत रामा शेळके याने लपेट डाव टाकत राजकुमार पाटील याला चितपट केले. या विजयामुळे रामा शेळकेला रोख एक लाख रुपये, चषक आणि ‘गुरू रेवणसिद्ध केसरी’ हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यासह पंचक्रोशीतील नामांकित पैलवानांनी या स्पर्धेत हजेरी लावत चुरशीच्या लढती रंगवल्या. शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्यांमुळे दिवसभर मैदानात उत्साहाचे वातावरण होते. अंतिम मानाच्या स्पर्धेत उपविजेता पै. राजकुमार पाटील याला २० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची ७५ हजार रुपयांची कुस्ती पुळूजचा पै. नवतेज कोंडकर व मोहोळचा पै. विक्रम गायकवाड यांच्यात झाली. या लढतीत नवतेज कोंडकर याने विजय मिळविला. विजेत्या पैलवानांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि फेटा बांधून सन्मानित करण्यात आले.
या कुस्ती मैदानासाठी पै. रवी शेळके, विठ्ठल हराळे, पै. सिद्धू माने, पै. रवी पवार, पै. सोन्याबापू ऐवळे, पै. रंगसिद्ध शेळके, विलास शेळके व पै. रोहित शेळके यांनी पंच म्हणून काम पाहिले. मैदान यशस्वी करण्यासाठी पै. रवी शेळके, पै. सचिन हेगडे, चंद्रकांत ढगे, साधूनाना पाटील, रामचंद्र शेळके, श्रीकांत धोडमिसे, राजुबापू धोडमिसे, रमेश शेळके, सजित पाटील, सुभाष पवार, उत्तम शेळके, विठ्ठल शेळके, महावीर धोडमिसे, अर्जुन ऐवळे, प्रकाश पवार व सामाजिक कार्यकर्ते पै. माऊली हेगडे यांनी परिश्रम घेतले. कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

