गुरू तेग बहादूर पुण्यतिथीनिमित्त चित्ररथ

गुरू तेग बहादूर पुण्यतिथीनिमित्त चित्ररथ

Published on

चास, ता. २८ : खरोशी (ता. खेड) येथे हिंद-दी-चादर श्री. गुरू तेग बहादूर साहीबजी ३५० वा शहीदी समागम चित्ररथाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खरोशी ग्रामस्थांच्या हस्ते चित्ररथाचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करत श्री. गुरू तेग बहादूर साहीबजी यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
भगवान श्रीकृष्णाच्या वाणीप्रमाणे छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी, वीर योद्धा महाराणा प्रताप या सारख्या महान योद्ध्यांनी देव, देश धर्मासाठी बलिदान दिले. याच धर्तीवर धर्मासाठी महान शिख गुरुनानक यांच्या नंतर त्यांच्या वंशातील श्री गुरू तेग बहादूर साहीबजी यांनी हिंदू धर्म टिकवण्यासाठी मोघलशाही साम्राज्या विरोधात हाती तलवार घेऊन धर्माचे रक्षण केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खरोशी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थांचा या वेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच रोहिणी लांघी, उपसरपंच गोरक्ष कौदरे, माजी सरपंच भोलेनाथ कौदरे, तुळशीराम लांघी, ग्रामपंचायत सदस्या आशा कौदरे, कल्पना कौदरे, नितीन कौदरे, ग्रामविकास अधिकारी रूपाली कड-मलघे, किसन कौदरे, सीमा कौदरे, सुजाता कौदरे, संदीप शेलार, भाऊसाहेब कौदरे, रोहिदास कौदरे, संतोष शिर्के तसेच खरोशी गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका धर्म जागरण प्रमुख नितीन कौदरे यांनी केले होते. सूत्रसंचालन विजय कौदरे यांनी केले तर भोलेनाथ कौदरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com