मंचर - नागरिकांचे आरोग्य टिकवणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे व पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन करणे या उद्देशाने ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पांतर्गत या उपक्रमाची सुरुवात आंबेगाव तालुक्यात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ५० शेतकऱ्यांना देशी भाजीपाला व कडधान्यांच्या मोफत बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.