esakal | कोरोनामुळे जिम व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे जिम व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ

काही व्यावसायिकांना अजूनही दिलासा मिळालेला नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे जिम व्यावसायिकांच्या अडचणीत वाढ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : कोरोनाच्या संकटातून हळुहळू बाहेर पडताना निर्बंधांना शिथिलता मिळत आहे. मात्र, काही व्यावसायिकांना अजूनही दिलासा मिळालेला नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिम व्यावसायिकही त्या पैकीच एक...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामती शहरात जवळपास 20 जिम आहेत. यातील बहुतेकांनी कर्ज काढून, उसनवारी करुन जिमची उभारणी केलेली आहे. 15 मार्चपासून जिम बंद असल्याने अनेकांपुढे उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. जिममुळे कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीपोटी गेले 90 दिवस शहरातील जिम बंद आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिम बंद असल्याने नियमित व्यायाम करणा-यांच्या शरीरावरही विपरीत परिणाम झाला आहे. व्यायाम कमी व खाणे जास्त झाल्याने अनेक नागरिकांचे वजनही ब-यापैकी वाढले आहे. बारामतीत पुरुषांसोबतच महिला वर्गही मोठ्या संख्येने जिमला जातो. सर्वांनाच जिम बंद असल्याचा फटका सहन करावा लागत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनेकांचे कर्जांचे हप्ते सुरु असून जिमच्या माध्यमातून शुल्करुपाने येणारे उत्पन्नही बंद झाल्याने बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांपुढे जिम कशा सुरु ठेवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने सर्व नियम पाळून जिम सुरु करण्यास परवानगी दिली नाही तर अनेकांवर बेकारीची कु-हाड कोसळू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शासनाकडून दिलेले सर्व निर्देश पाळूनच जिम सुरु करण्याचा जिम व्यावसायिकांचा मानस आहे, मात्र या पार्श्वभूमीवर तातडीने परवानगी देणे गरजेचे आहे. ही परवानगी लवकर मिळाली नाही तर आमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकते, याचा शासनाने सहानुभूतीने विचार करावा.

- परेश वाघमोडे, जिम व्यावसायिक.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा