
हडपसर - एकदा ध्येय निश्चित झाले आणि ते गाठण्याची जिद्द निर्माण झाली की कोणतेही आव्हान माणसाला पालापाचोळा वाटते. वृद्धापकाळाकडे झुकलेले वय, त्यामुळे झिजलेले दोन्ही गुडघे, डोळ्यावर चष्मा, लहानपणीच तुटलेला उजव्या हाताचा अंगठा, हाड मोडून वाकडा झालेला हाताचा कोपरा, दोन वर्षापूर्वी खांद्याच्या स्नायूंची झालेली शस्रक्रिया आणि यापूर्वी आलेले अपयश अशा सर्व आव्हानांवर मात करीत येथील नवनाथ झांजुर्णे या सत्तरीतील तरूणाने अखेर आयर्न मॅनवर आपली मोहोर उमटवली आहे. भारतातील सर्वात ज्येष्ठ आयर्नमॅन होण्याचा मान मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे.