हडपसर भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर विधानसभा मतदार संघातील भाजप महिला आघाडी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

हडपसर भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर

हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघ भाजप महिला आघाडी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा स्वाती प्रमोद कुरणे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत आठ उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस तर पाच चिटणीस यांचा समावेश आहे. कार्यकारिणीत शारदा पानमन, कल्पना शेलार, मेनका उमडेकर, संजना शर्मा, शोभा डावरे, मोहिनी शिंदे, नूतन पासलकर, अश्विनी सूर्यवंशी यांची उपाध्यक्षपदी

छाया गदादे, रेखा माने, शोभा लगड यांची सरचिटणीस पदी तर उज्वला चव्हाण, छाया दांगट, सुनीता रायकर, निकिता निगाले, मोनाली हिंगणे यांची चिटणीस म्हणून निवड झाली आहे.

मतदार संघाचे माजी आमदार व ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली व हडपसर विधानसभा अध्यक्ष संदिप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून एका जाहीर कार्यक्रमात निवड झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांना शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आली. यावेळी संघटन सरचिटणीस गणेश घोष, संदीप लोणकर, उपाध्यक्ष भूषण तुपे, नगरसेविका रंजना टिळेकर, संध्या टिळेकर, नगरसेविका वृषाली कामठे, उज्वला जंगले, मनीषा कदम आदींसह शहर भाजपा व हडपसर विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते.

महिला आघाडी अध्यक्षा कुरणे म्हणाल्या, "हडपसर विधानसभा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होत असून महापालिका निवडणुकीत या मतदारसंघात सर्व जागा भाजपला मिळविण्यासाठी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते मंडळी ,शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सर्वच पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने ही महिला कार्यकारिणी 'शत प्रतिशत हडपसर' साठी काम करेल असा विश्वास आहे.'

loading image
go to top