Hadapsar: साडेसतरानळी येथील आगीत एकाचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेसतरानळी येथील आगीत एकाचा होरपळून मृत्यू

हडपसर : साडेसतरानळी येथील आगीत एकाचा होरपळून मृत्यू

हडपसर : साडेसतरानळी येथील डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत राजू भिमसेन काळे (वय ५२, रा. साडेसतरानळी) या दिव्यांग कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाने दुपारी उशीरापर्यंत प्रयत्न करून ही आग विझवली.

दिलीप महापात्रा यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. साडेसतरानळी येथे सुमारे दहा वर्षापासून त्यांचे गोदाम आहे. या गोदामात डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात आले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येथील साहित्याला आग लागली. पहिल्या मजल्यावर त्यांच्याकडे काम करणारा राजू काळे हा दिव्यांग व्यक्ती झोपला होता.

हेही वाचा: पुणे : ओरीगामीतून आर्यनची विश्वविक्रमाला गवसणीचा प्रयत्न

चालता येत नसल्याने त्याला यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे होरपळून व गुदमरून त्याचा मृत्यू झाला. गोडाऊनमधील लाकडी फळ्या, बांबू, कापड, तयार डेकोरेशन, कार्पेट, फ्लेक्स आदी मोठ्याप्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे पंचवीस अग्नीशामक बंबाद्वारे आग विझविण्याचे काम पहाटेपासून सुरू होते. दुपारी ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले.

loading image
go to top