

Bomb found Hadapsar Hospital
esakal
पुणे - हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयातील स्वच्छतागृहात ‘टायमर बॉम्ब’सदृश वस्तू ठेवून शहराला हादरवून सोडणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. दरम्यान, हा कोणताही दहशतवादी कट नसून, रुग्णालयाकडून खंडणी उकळण्यासाठी रचलेला डाव होता, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.