

Suspect in Long‑Pending Pune Murder Case Arrested in Haridwar
Sakal
पुणे : हडपसर येथील कॅनॉलमध्ये एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या आरोपीला २० महिन्यांनंतर हडपसर पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेल्या या तपासामुळे खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आला. वैभव मनोज जाधव (वय २४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील कॅनॉलमध्ये पाच मे २०२४ रोजी एक तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. नागरिकांनी त्यास ससून रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. चौकशीत मृत तरुणाचे नाव विनोद मधुकर शार्दूल (वय ४५, रा. दिवा पूर्व) असे निष्पन्न झाले.